पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी आजवर 899 विद्यार्थ्यांनी पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अर्ज केले आहेत.
नागरवस्ती विकास योजना विभागाच्या इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत ही बक्षिसे दिली जाणार आहेत. 80 ते 90 टक्के गुण मिळविलेल्यांना 10 हजार तर 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. बारावीच्या परीक्षेत 80 टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या 167 विद्यार्थ्यांनी बक्षीस योजने अंतर्गत अर्ज केले आहेत अर्ज स्वीकारण्याची मुदत 6 सप्टेंबर पर्यंत आहे या योजनेचा लाभ घेणार्या विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज सादर करून नागरी सुविधा केंद्राकडून पोच घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.