9 रोजी राष्ट्रवादीतर्फे जिल्हाभरात जनआंदोलन

0

जळगाव : मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सोसावे लागले. नोटाबंदीचा निर्णय घेतांना 50 दिवसाची मुदत मागण्यात आली होती परंतु 50 दिवस उलटल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थी’ असल्याने सामान्यांची परवड सुरुच आहे. विद्यमान सरकार हे जनतेच्या हिताचे नसून शासन जनतेची क्रुर थट्टा करीत आहे अशा सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी 9 जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे जिल्ह्याभरात जनआंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षातर्फे राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष आमदार सतिष पाटील यांनी दिली.

युती करण्याचा निर्णय घेणार स्थानिक पदाधिकारी
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी प्रत्येक तालुकास्तरावर कोणताही अनुचीत प्रकार घडू न देता संवेदनशील मार्गाने घटनेच्या चौकटकीत राहून जनआंदोलन करावे असे आवाहन आमदार सतिष पाटील यांनी केले. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुकास्तरीय कार्यकर्त्याचा मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले. 15 जानेवारी रोजी निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत राष्ट्रवादी कार्यालयात माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. महिला उमेदवार असेल तर महिला उमेदवारांनीच मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आदेश देण्यात आले. स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून आवश्यक असेल तर युती करण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकार्‍यांनी घ्यावे असे आदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले असल्याची सुचनाही यावेळी करण्यात आली. गट-तट विसरून पक्ष कार्यकर्त्यांनी आगामी निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करावे. माजी आमदार दिलीप वाघ, माजी खासदार वसंत मोरे, परेश कोल्हे, गफ्फार मलिक, डी.के.पाटील, विलास पवार, शरद पाटील, विकास पाटील, खलील देशमुख तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते.