नवापुर। मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यामुळे त्यांची अंमलबजावणी करण्या करिता दि 9 ऑगस्टला सामुहिक रजा आंदोलन आणि दिनांक 21 ऑगस्टपासुन बेमुदत काम बंद आंदोलना बाबतची निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे,आरोग्य निरीक्षक भरत पाटील,सुधिर माळी, राजेंद्र चव्हाण,राजु गावीत,वामन अहिरे,प्रशांत भट, एस जे शिरसाठ, रमेश गावीत, मधुकर राजपुत, परशराम ठाकरे, अंनत पाटील, एन.बी.अहिरे,आर.डी बागले, डी.एच.मराठे, संतोष वाघ,युवराज पानपाटील,अशोक दंडोरे,भरत सोनार,प्रमिला वसावे,सतिष बागुल,आदीचा सह्या आहेत.
वारंवार केलेल्या मागण्यांकडे शासनाने केले दुर्लक्ष
निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील नगर पालिका मधील कार्यरत सर्व मुख्याधिकारी, कर्मचारी, रोजंदारी, कत्रांटी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेमार्फत बरेच आंदोलने करुन निवेदने दिली आहेत. शासमानाकडे वेळोवेळो पाठपुरावा केला जात आहे. पंरतु नगर पालिका कर्मचार्यांचा मागण्या पुर्ण होत ऩाही. शासन मागण्या संदर्भात नेहमीच दुर्लक्षीत करत आहे. सदर कारणाने त्यामुळे राज्यातील सर्व संघटनांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य नगर पालिका/नगर पंचायत/मुख्याघिकारी,कर्मचारी कामगार संघटना संघर्ष समितीने आमच्या न्याय मागण्या मान्य करण्या करिता नगरपालिके मघ्ये सर्व कर्मचारी 9 ऑगस्टला एक दिवसाचे सामुहिक आंदोलन करणार आहेत. तरी शासमाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नगर पालिके तील सर्व कर्मचारी 21 ऑगस्ट पासुन बेमुदत काम बंद आंदोलन करेल या दोन्ही तारखेच्या आंदोलनाची आम्ही बी नोटीस आपणास देत आहोत हीच आमची अ़ंतिम नोटीस आहे मागण्या मान्य न झाल्यास व आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.