9 वीच्या अभ्यासक्रमांचे शिक्षकांना प्रशिक्षण

0

शहादा । चालु शैक्षणिक वर्षापासुन इयत्त्ता 9 वीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्या आधारावर जलदगतीने शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे चार टप्प्यात आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या टप्प्याचे प्रशिक्षण येत्या 8 जुलै रोजी होणार आहे. लोणखेडा ता. शहादा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शहादा व धडगाव तालुक्यातील शिक्षकांच्या समावेश आहे 2 जूलै रोजी तिसरा टप्पा संपला आहे. प्रत्येक केंद्रावर प्रत्येक टप्प्यात 100 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

बदललेल्या शिक्षणक्रमाबाबत मार्गदर्शन
संबंधित शिक्षकांची नावे प्रत्येक विद्यालयाचा मुख्याध्यापकांना आधीच सुचविली आहेत. कोणता शिक्षक कोणत्या टप्प्यात प्रशिक्षण घेणार हे सुचित केले आहे. इंग्रजी व गणित विषयाचे प्रशिक्षण जिल्हा शैक्षणिक विकास सस्थेचे प्राचार्य डॉ . आर. डी. कांबळे यांचा मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातील एकूण 1200 शिक्षकाना प्रशिक्षीत केले जाणार आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास सस्थेचे अधिव्याख्याता प्रा प्रवीण चव्हाण यांचा संयोजनाखाली तंज्ञ मार्गदर्शक म्हणून किरण पाटील, अशोक पाटील, दिनेश पाटील, राजेंद्र पाटील, योगेश पाटील, हेमराज भाबड, के. व्ही. पाटील, पी. टी. देवरे काम पहात आहेत. प्रशिक्षणासाठी शहादा गटसाधन केंद्राचे विषय सहाय्यक प्रकाश भामरे, मनोज पाटील व लोणखेडा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी . डी . शिंदे प्रयत्नशील आहेत.