नवापुर । तालुक्यात राखीव वनक्षेत्रात अनाधिकृतपणे अतिक्रमणकरणार्यांची संख्या वाढली आहे. जंगलमधील अतिक्रमण काढण्याची कारवाई उपवनसंरक्षक अधिकारी पीयुषा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई धुळे, चिंचपाडा येथील अधिकार्यांनी सहभाग घेतला होता. 9 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. तर 3 हेक्टर मध्ये जे.से.बी मशिनचा सहायाने सखोल जलशोषक खोदुन अतिक्रमण धारकांचा मज्जाव केला. या कारवाईत वनअधिकारी धुळे दक्षता उमेश वावरे नंदुबार सहायक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे. नवापुर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिचंपाडा वनक्षेत्रपाल आर.बी.पवार यांनी ही कारवाई केली.
119 कर्मचार्यांचा ताफा
जंगलात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत होते. येथे नवीन अतिक्रमण करणे जोरात सुरू होते. जंगलातील अतिक्रमण वाढचा वेग पहाता वनविभागाने धडक कारवाई करून हे अतिक्रमण थांबविले आहे. या धडक कारवाईमुळे अतिक्रमणधारक धास्तवले आहेत. या अतिक्रमणधारकांनी जंगलात पिकांची पेरणी केली होती. अतिक्रमणाची कारवाई करतांना ही सर्व पिके नष्ट करण्यात आली आहेत. जंगलातील अतिक्रमण काढण्यातांना राज्य राखीव पोलीस दलाचे 10, पोलीस कर्मचारी 4, महसूल विभागाचे कर्मचारी 4, माजी सैनिक 5, नंदुरबार उपविभागाचे 100 कर्मचारी असे सर्व मिळून 119 कर्मचार्यांच्या ताफ्याने ही कारवाई केली.
तीन वेळा बजावली होती नोटीस
अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी याआधी 3 वेळा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, या अतिक्रमणधारकांनी त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला होता. वारंवार नोटीस देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नसल्याने जेसीबी, वनविभागाच्या फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. यावेळी मोठ्याप्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जंगलातील अतिक्रमणधारकांना नोटीस देवूनही त्यांनी अतिक्रमण काढले नसल्याने आज अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. यानंतर पुढच्या मोहिमेत मौजे खेकडा भागात नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
प्रशासनाला मोठे यश
जंगलात अतिक्रमण वाढले असून प्रशासनातर्फे करण्यात आलेली ही धाडसी कारवाई आहे. ही कारवाई यशस्वी करण्यास प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. या जंगलात जीवंत झाडाखाली आग लावून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलाला आढळून आला. या अतिक्रमणनिर्मुलन कारवाईत जंगलात थाटण्यात आलेल्या झोपड्या काढण्यात आल्या. तसेच लाकुड तोडण्याचे अवशेष सर्वत्र दिसून येत होते. ही मोहीम सकाळी 7 वाजताच सुरू करण्यात आली. तसेच सायंकाळपर्यंत ही धडक कारवाई सुरूच होती.