९४ खासदारांनी संपत्ती जाहीर केलेली नाही

0

नवी दिल्ली-निवडणूक लढविल्या ठराविक दिवसात संपत्तीची आकडेवारी द्यावी लागते. मात्र लोकसभेचे ६५ खासदार आणि राज्यसभेच्या २९ खासदारांनी आतापर्यंत आपली संपत्ती किंवा कर्जाची घोषणा केलेली नाही. माहिती अधिकार कार्यकर्त्या रचना कालरा यांनी ही माहिती मागितली होती. त्यात ही बाब उजेडात आली आहे. लोकसभेतील ६१ खासदारांनी २०१४ पासून आपल्या संपत्तीची घोषणा केलेली नाही. यामध्ये ४ जण पोटनिवडणुकीत निवडून आलेले आहेत.

यातील ४ खासदार हे काँग्रेस तर ७ जण हे टीडीपीचे खासदार आहेत. तर तृणमूल काँग्रेस, बिजद, भाजपा, सपा, टीआरएस आणि एलजेएसपीसारख्या पक्षांचे ४-४ खासदार आहेत. त्यांनी अद्यापपर्यंत आपल्या संपत्तीची घोषणा केलेली नव्हती.

तर आपचे ३, शिवसेना आणि आरजेडी, अकाली दल, जेडीयू आणि जेएमएमच्या २-२ खासदारांचा यात समावेश आहे. एआयडीएमके, वायएसआर, आयएएलडी, एनपीपी, एनसीपी, एनडीपीपी आणि इतर पक्षातील १-१ खासदारांचाही यात समावेश आहे.

२९ राज्यसभा खासदार असे आहेत ज्यांनी आपल्या संपत्तीची विस्तृत माहितीच दिलेली नाही. यामध्ये ६ काँग्रेस आणि ६ भाजपाचे सदस्य आहेत. तर आरजेडी, एआयटीसी आणि टीआरएसच्या ३-३ खासदारांचा समावेश आहे. बिजद आणि जेडीयू या दोन्ही पक्षातील २ खासदारांनी आपल्या संपत्तीची विस्तृत माहिती दिलेली नाही.