90 टक्के ई-फेरफार पूर्ण; कामकाजास वेगाने सुरूवात

0

जळगाव । शेतकर्‍यांच्या दृष्टिने जमिनीचा सातबारा हा अतिशय महत्वपूर्ण दस्ताऐवज. हा दस्तऐवज शेतकर्‍यांना आणि त्या त्या जमिन मालकाला ऑनलाईन उपलब्ध व्हावा यासाठी सातबाराचे संगणकीकरण व ई-फेरफार ची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. यात जळगाव जिल्ह्याचे कामकाज वेगाने सुरु असून सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.. जळगाव जिल्ह्यात एकूण 11 लाख 57 हजार 694 सर्व्हे क्रमांक आहेत. त्यापैकी 2 लाख 74 हजार 361 सर्व्हे क्रमांकावरील काम यापूर्वीच प्रमाणित करण्यात आले आहे. तर 7 लाख 77 हजार 112 सर्व्हे क्रमांक एडिट मार्क करण्यात आले आहे. एडिट मार्क करण्यात आलेल्या सर्व्हे क्रमांकापैकी 7 लाख 64 हजार 411 सर्व्हे क्रमांकही प्रमाणित करण्यात आले आहे.

10 लाख 38 हजार 772 सर्व्हे क्रमांकांचे काम एडिट मोड्युलमध्ये पूर्ण
एकूण सर्व्हे क्रमांकापैकी 10 लाख 38 हजार 772 सर्व्हे क्रमांकांचे काम एडिट मोड्युलमध्ये पूर्ण झाले आहे. यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ऑनलाईन सातबारा एडिट मोड्युलचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या कुशल नियोजनात महसूल यंत्रणा काम करीत आहे. हे काम पूर्ण होताच खातेदारांना बिनचूक ऑन लाईन सातबारा बसल्याजागी मिळणार आहे. चावडी वाचन मोहिमेचे काम गुणवत्तापूर्वक करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

सातबारामध्ये अचूक संगणकीकृत अधिकार अभिलेखांसाठी तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकार्‍यांकडून चावडी वाचन मोहीम हाती घेण्यात आली आहे. ई-प्रणाली व ई-चावडी प्रणालीची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑनलाईन सातबारामध्ये त्रुटी राहू नये यासाठी तीन टप्प्यांत ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत खातेदारांनी सहभागी होऊन आपल्या सातबारावरील नोंदीची खातरजमा करुन घ्यावी.

मोहिमेचे तीन टप्पे
1 ते 15 मे दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात खातेदारांनी महा ई सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल, जिल्हा व तालुका ”सेतू” या ठिकाणावरून सातबारा प्राप्त करून त्यासंबंधीचे आक्षेप तलाठी, तहसीलदार यांच्याकडे नोंदवावेत. 16 मे ते 15 जून दरम्यानच्या तबाराच्या प्रिंट काढत आढळलेल्या चुका हिरव्या शाईने दुरुस्त करणे