तळेगाव दाभाडे । तळेगाव शहरात सुमारे 90 ठिकाणी सार्वजनिक मंडळाकडून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहेत. मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखावे आणि आरास, सजावटीच्या कामात गुंतले आहेत.
115 वर्षापासून ही मंडळे आजपर्यंत हा सण साजरा करीत आहे. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज गणेश उत्सव मंडळ, कालिका मंदिर गणेश मंडळ, तिळवण तेली समाज गणेश मंडळ, राजेंद्र चौक सार्वजनिक गणेश मंडळ, श्री गणेश तरुण मंडळ या मानाच्या पहिल्या पाच गणपती शिवाय भेगडे तालीम गणेश मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, सरसेनापती उमाबाई दाभाडे मंडळ, मुरलीधर मंडळ, फेड्रस क्लब मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, विशाल मंडळ, शाळा चौक मंडळ, हिंदुराज मंडळ, राष्ट्रतेज तरुण मंडळ, अष्टविनायक मंडळ, चावडी चौक मंडळ,पाच पांडव मंडळ, शेतकरी मंडळ,राजा शिवछत्रपती मंडळ, तरून ऐक्य मंडळ, शिव शंभो मंडळ, मारुती चौक मंडळ, एकता मंडळ, राव कॉलनी प्रतिष्ठान मंडळ, संत तुकाराम नगर मंडळ, शिवाजी मंडळ, जिजामाता चौक मंडळ, शिव शंकर मंडळ, अमरखडकेश्वर मंडळ, स्वामी विवेकानंद मंडळ आदी मंडळांकडून गणरायांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्या. पावसाचे वातावरण असल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले. देखावे, सजावट, आरास करण्यात पावसामुळे अडचणी निर्माण होत होत्या. आपापल्या मंडळापुढील देखावे उभे करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी जीवाचे रान करीत आहेत.