900 शहरांत मोदींच्या त्रिवर्षपूर्तीचे सेलीब्रेशन

0

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे भाजपकडून देशभरात जल्लोष करण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता मिळवली आणि मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले.

500 शहरांमध्ये ‘सबका साथ, सबका विकास कार्यक्रम
भाजप 26 मेपासून 15 जूनपर्यंत मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी फेस्टिव्हल साजरा होणार आहे. देशातील 900 शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाईल. हा उत्सव 20 दिवस सुरू राहणार आहे. पंतप्रधान मोदी सामान्य नागरिकांसाठी दोन कोटी पत्र लिहिणार आहेत. 15 दिवसांत 10 कोटी एसएमएस केले जातील. 500 शहरांमध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

पंतप्रधान मोदी देशाच्या पाच शहरांचा दौरा करतील, ज्याची सुरुवात गुवाहाटीपासून होईल. यानंतर मोदी बंगळुरू, पुणे, कोलकाता, जयपूर आणि कोटापैरी चार शहरांत जातील. न्यू. इंडिया अभियान 25 मेपासून सुरू होणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत.

जल्लोष कसला करता
तुमच्या सरकारने तीन वर्षे जनादेशाचा विश्‍वासघात केला. मागील तीन वर्षे सत्तेत राहिल्यानंतर तुमच्याकडे दाखवण्यासारखे काय आहे? जनतेच्या स्वप्नांचा चुराडा आणि अकार्यक्षमता हेच तुमचे कर्तृत्व आहे. अखेर तुम्ही जल्लोष का करत आहात?
राहुल गांधी, काँग्रेस नेते.

दहशतवादाचा प्रश्‍न कायम
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत राहिला, तर वाढता दहशतवाद, पाकिस्तानशी बिघडलेले संबंध, वाढती महागाई तसेच रोजगार हे प्रश्‍न सध्या मोदी सरकारसमोर कायम आहेत.