शहादा। स्वछ शहर, सुंदर शहर अभियानाअंतर्गत शहरात शासकीय अनुदान उभारीत शौचालय बांधकाम प्रगतीपथावर आहे. बदलत्याकाळानुरुप जनतेच्या सोयीचे आधुनिक पध्दतीने सार्वजनीक शौचालयाचा वापरापासुन शहादा शहर हगणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. येथील शहादा नगरपरीषद स्वछ महाराष्ट अभियानाअंतर्गत दोन हजार 900 वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी दोन हजार 470 वैयक्तीक शौचालयाचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील उघड्यवर शौचाल्य करणार्या लाभार्थीना पालीकेकडे प्रस्ताव टाकुन वैयक्तिक शौचालय बांधकाम होत असल्याने शहर हगणमुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
चोवीस तास पाणी स्वच्छता राहणार
शहरात चौदा सार्वजनिक शौचालय आहेत त्यापैकी तीनचे नविन कामे होत असुन इतरांची दुरुस्ती होत आहे शहरात समता नगर ,सालदार नगर ,भवानीचौक,रामगड,सिधार्थ नगर ,ईंदिरा मार्केट ,व्हालेंटरी शाळेसमोर ,गोसीया नगर मिरा नगर सुलतान हाउस पालिका मराठी शाळा क्रमांक 14,15 लगत स्विपर कालनी ,अब्दुल हमीद चौक समोर या भागात सार्वजनिक शौचालय बांधन्यात येणार आहे .गरीबनवाज वसाहत भागात सालदार नगर महावितरण विजकंपनीच्या कार्यालयामागे सिद्धार्थनगर भागात असुन त्या ठिकाणी चोवीसतास पाणी स्वछता राहाणार यासाठी सेवा फाउंडेशनने ठेका घेतला आहे. इंदिरा मार्केट सालदार नगर भागातील शौचालयाची दुरावस्था होती, नाकाला रुमाल लावुन तो परिसर पार करावा लागत होता.नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व त्यांच्या सहकारी नगरसेवकानी सार्वजनीक शौचालयच्या नविन बांधकामासाठी प्रयत्न केले.