97 व्या वर्षी पूर्ण केले शालेय शिक्षण

0

फिलाडेल्फीया । दुसर्‍या महायुद्धात भाग घेतलेल्या चार्ल्स लेउझ्झी या 97 वर्षे वयाच्या एका योद्ध्याने शाळेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. दक्षिण फिलाडेल्फीयात त्यांना समारंभपूर्वक पदवी प्रदान करण्यात आली. मला खूपच थांबाव लागल पण डिप्लोमा मिळालाच, चार्ल्स लेउझ्झी नावाचा हा 97 वर्षाचा हायस्कूल विद्यार्थी असं म्हणतो. कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी चार्ल्स यांना दुसर्‍या महायुद्धात सैनिक म्हणून सहभागी व्हावे लागले होते.

शाळेच्या मेडलची भर महायुद्धातील मेडलमध्ये असे त्यांना वाटते. समारंभासाठी जमा झालेल्या लोकांनी त्यांना विचारले आता शाळा संपली. कॉलेजला जाणार का. यावर चार्ल्स म्हणाले आता माझ्याकडे खूप वेळ आहे आणि दुसर करण्यासारखं काही नाही. त्यामुळे कॉलेजला जावच लागणार.