यावल येथे एकात्मिक आदीवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस लोकप्रतिनिंच्या उपस्थित होणार साजरा

यावल (प्रतिनिधी ) येथील जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , यावल या कार्यालयाच्या वतीने ९ ऑगस्ट बुधवार रोजी जगतीक आदीवासी दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे . यावल येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन आदिवासी दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात येणार आहे . दिनांक ९ ऑगस्ट हा दिवस संपुर्ण जगातील आदिवासींचा आत्मसन्मान जपणाऱ्या आणि अस्मिता फुलवणाऱ्या या जागतिक आदिवासी साजरा करण्यात यावा असे युनो च्या वतीने घोषीत केल्यामुळे या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे .आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे , त्यांचा जल -जंगल आणी जमिनिवरील अधिकार अबाधित राहावा , या करिता व्यापक जनजागृतीची आवश्कता लक्षात घेता शासन आणी आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या विविध आदिवासी समाजसेवी संघटना या वतीने हा जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी १० वाजता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात प्रकल्प कार्यालयाच्या समोर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन , या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी हे उपस्थित राहणार असुन, या शिवाय आदिवासी संघटना , कार्यकर्ते ,आदिवासी समाजसेवक व आदिवासी बांधवांच्या पारंपारिक वेशभुषा परिधान करीत मोठया संख्येत विद्यार्थीनी व विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली असुन, या कार्यक्रमास आदिवासी समाज बांधवांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रकल्प कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे .