सावदा (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या १० दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात १० वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपले परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा प्रदीप सुखा कोळी वय 56 याने पीडित मुलीला दुकानात बोलवून चॉकलेटचा आमिष दाखवले. त्यानंतर घरात नेऊन तिच्यासोबत अश्लिल चाळे करत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समजल्या नंतर तिच्या आईने सावदा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन शनिवारी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रदीप सुखा कोळी याच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नी. जालिंदर पळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अन्वर तडवी करीत आहे.