एका 28 वर्षीय तरुणाला गावातील तिघांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी

फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी l

मारुळ ता यावल येथे सार्वजनिक जागेवर लाकडाचे खांब गाडत असतांना वाद झाला. यामध्ये एका 28 वर्षीय तरुणाला गावातील तिघांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

मारूळला सार्वजनिक ठिकाणी अण्णा हुसेन अली, शफी अली अण्णा, मुजफ्फर अली हे तिघे खांब गाडत होते. जाकिर याकुब तडवी (28) या तरुणाने त्यांना विचारले की, इथे तुम्ही खांब का गाडत आहात याचा राग येऊन या तिघांनी 28 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करीत मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देविदास सूरदास करीत आहे