वरणगांव नजिक स्फोटक पावडर भरलेल्या ट्रकला बसची धडक

प्रतिनिधी । वरणगांव

वरणगांव ते मुक्ताईनगर महामार्गावरील फॅक्टरी फाट्याच्या वळणावर भुसावळ कडुन येणाऱ्या बसने स्फोटक पावडर असलेल्या ट्रकला जबर धडक दिली. या धडकेत बसचे पुढील काच फुटले तर सुदैवाने स्फोटक पावडरच्या ट्रकचे किरकोळ नुकसान झाल्याने मोठा अनर्थ टळला.

मध्यप्रदेशातील इटारसी आयुध निर्माणीतुन वरणगांव आयुध निर्माणीत बंदुकीची गोळी तयार करण्यासाठी लागणारी बॉल पावडर घेऊन येणारा ट्रक ( क्र . एम.पी. ०५ / जी – ६९६२ ) वरणगांव ते मुक्ताईनगर महामार्गावरील फॅक्टरी फाट्याकडे वळण घेत असतांना भुसावळ कडुन मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या बसने ( क्रं. एम.एच. १४ / बीटी – ४०१५) मध्य भागी जबर धडक दिली. या धडकेत ट्रकचे किरकोळ नुकसान झाले असून बसच्या पुढील काचा फुटल्या आहेत. तसेच बस वळणाच्या डिव्हायडर मध्ये रुतल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. हा अपघात ४ ऑगष्ट रोजी सांयकाळी ७ वाजेदरम्यान घडला . याप्रकरणी ट्रक चालक संतोष रामस्वरूप यादव (वय – ४२ रा. आयुध निर्माणी इटारसी ) यांच्या फिर्यादीवरून बस चालक भरतसिंग फुलचंद डुमाले रा. शिवगांव ता. वैजापूर , जि. छत्रपती संभाजी नगर यांचे विरुद्ध वरणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.