आक्षेपार्ह लिखाण प्रसारीत केल्या प्रकरणी सावदा येथे 1 जणां विरुद्ध गुन्हा दाखल

सावदा :- सावदा ता, रावेर येथे 25/6/2023 रोजी सायंकाळी 7-12 वाजेच्या सुमारास शहरातील दिपक राज पाटील समर्थ अकॅडमीचे शिक्षक यांनी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून इंस्टाग्राम ॲपवर आक्षेपार्य लिखाण प्रसारित केल्याने याबाबत फिर्यादी व त्याचे दोन साथीदारांनी आक्षेपार्य पोस्ट का शेअर केली, अशी विचारणा केली असता

माझे काय वाकडे करायचे ते करून

घ्या? असे धमकी देऊन

जातिवाचक बोलून फिर्यादी व त्याचे धर्मांचे भावना दुखावले

पुंडलिक संन्यास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सावदा पोलीस ठाण्यात यावरून, याबाबत श्रीकांत उर्फ नाना दीपक राज पाटील यांच्या विरोधात गुरनं. 143 / 2023 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 सुधारणा कायदा 1015 चे कलम 3(1) (आर) (5), व भादवीचे कलम 506 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला त्याला अटक देखील करण्यात आले आहे. पुढील तपास एपीआय जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाले हे करीत असून घटनेच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, कुणाल सोनवणे सह फैजपूर पो.स्टचे पोलीस एपीआय निलेश वाघ व कर्मचारी उपस्थित होते.