आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ।

शेजारचांच्या त्रासाला कंटाळून रामेश्वर कॉलनीतील उमेश एकनाथ ठाकूर (वय ३७) या तरूणाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी समोर आली होती. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशीरा पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश ठाकूर हा आई, वडील पत्नी व दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ वास्तव्याला होता. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल, रूखमा रमेश तिरमल आणि माधुरी गजानन तिरमल सर्व रा. रामेश्वर कॉलनी यांनी वेळावेळी मनासिक त्रास दिला. तसेच न्यायालयात वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून उमेश ठाकूरने सुसाईड नोट लिहून शेजारी राहणाऱ्या तिरमल परिवाराच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत, असे चिठ्ठीवर नमूद करत राहत्या घरात बुधवारी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी सुरुवातीला | अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री उशीरा मृत उमेश ठाकूरची पत्नी हेमलता ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल, रुख्मा रमेश तिरमल आणि माधुरी गजानन तिरमल सर्व रा. रामेश्वर कॉलनी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.