कोऱ्हाळा येथे दुचाकी पेटविली दोघां विरोधात गुन्हा दाखल

 मुक्ताईनगर प्रतिनिधी l

तालुक्यातील कोऱ्हाळा येथे लहान मुलांच्या मागील वादाच्या राग मनात धरून शुक्रवारी रात्री दुचाकी पेटविली

या प्रकरणी संजय सुखदेव कांडेलकर वय ४५ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की संशयित दिपक मोहन भोलाणकर,व उमेश उत्तम कांडेलकर यांनी २ जूनच्या मध्यरात्री १२ ते ३ च्या वाजेच्या दरम्यान फिर्यादी संजय कांडेलकर यांच्या मालकीची दुचाकी क्र एम एच १९ डी एच ६९९३ एच एफ डीलक्स मोटार सायकल फिर्यादीचे काका अनंता कांडेलकर यांच्या घरासमोरून ओढुन नेत मुकुंदा न्हावकर यांच्या नवीन बांधकाम घरात नेऊन काही ज्वलनशील पदार्थ टाकून गाडी पेटवून दिली असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला ४३५ ,४२७ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार श्रावण जवरे करीत आहे