भुसावळ l येथील महामार्गा लगत असलेल्या ट्रामा सेंटर जवळ २१ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास एक दाम्पत्याचा अपघात झाला . त्यांच्यावर उपचार झाले यावेळी माणुसकीचे दर्शनही घडले.
याबाबत सविस्तर असेकी , येथील नेत्रम हॉस्पिटल चे सुनील मेश्राम हे नेहमी प्रमाणे जळगाव ला निघाले असता ट्रामा सेंटर च्या गेटजवळ एका विवाहित तरुण दाम्पत्याचा अपघात होऊन ते पडले होते. युवकास त्याची पत्नी उचलून उठवण्याचा प्रयत्न करत होती . यावेळी मेश्राम यांनी त्यांना मदत केली तसेच हि घटना पाहू रस्त्यावरील ये जा करणाऱ्या काही जणांनी थांबून मेश्राम यांच्या मदतीने जखमींना ट्रामा सेंटर मध्ये नेऊन उपचार केले . युवकाच्या डोक्याला टाके घालण्यात आले तर महिलेवर उपचार करण्यात आले. जखमी युवकाने त्याच्या मित्रास घटनेची माहिती दिली . त्यांचे सहकारी आल्यानंतर ते ट्रामा सेंटरच्या बाहेर जाई पर्यंत मेश्राम त्यांच्या सोबतच थांबले होते .
एरवी अपघात झाल्या नंतर लोक झंझट नको म्हणून सरळ पुढे निघून जातात पण अनेक जण माणुसकी म्हणून जखमींना मदत करतात .