बेकायदेशीर रित्या अग्निशस्त्र व काडतुस कब्जात बाळगणाऱ्या एका गुन्हेगारास अटक

बोदवड प्रतिनिधी l

येथे दिनांक २२ मे२३ रोजी बोदवड तहसिल कार्यालय परिसरात रोड ने एक इसम संशयित रित्या कमरेला गावठी कट्टा लावून फिरत आहे अशी खात्रीलायक गोपनीय माहिती मिळतास बोदवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे स्वतः हा स्टॉप सह तहसिल कार्यालय परिसरात सापळा रचून न ह रांका हायस्कूल समोर एक इसम संशयित रित्या फिरतांना दिसून आला त्या इसमास पोलिसांनी अडवून त्याला विचारपूस केली असता तो इसम उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी त्या इसमाला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक दादाराव शेजोळे (वय २२) राहणार येवती तालुका बोदवड ह मु नानेकरवाडी चाकण पुणे असे सांगितले त्याची अंगाची झाडाझडती घेतली असता पोलिसांना त्याच्या कब्जात १५००० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीन सह ५०० रुपये किमतीचे एक जिवंत कडतुस मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध बोदवड पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे

सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ,सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव,मुकेश पाटील,निखिल नारखेडे,भगवान पाटील,निलेश सिसोदे यांनी केली