VIDEO: उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला; अनेक जण वाहून गेले

0

चमोली: उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ आज रविवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी दुर्दैवी घटना घडली. चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळला. त्यामुळे पूर आल्याने अनेक जण बेपत्ता झाले आहे. जोशीमठ ते हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमकडा कोसळल्याचे दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. विध्वसंकारी असे हे दृश्य आहेत. कडाक्याची थंडी असतांना ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. मोठय प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने धौलीगंगा नदीतील पाणी वाढले आहे, त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.