माजी क्रिकेटर श्रीसंतच्या घराला आग !

0

एडप्पल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज श्रीसंत यांच्या केरलमधील एडप्पल्ली येथील घराला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला प्रचारण करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ शकली नाही. या आगीत किरकोळ नुकसान झाले आहे.

श्रीसंतवर प्रतिबंधक औषधाच्या सेवनामुळे कारवाई करण्यात आली होती. तेंव्हापासून तो क्रिकेट पासून दूर आहे. केरळच्या राजकारणात तो सक्रीय आहे.