नाशिक (प्रतिनिधी)
सलग ३० वर्ष सक्रिय पत्रकारिता केल्यानंतर हरिभाऊ सोनवणे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.त्याचे कारण म्हणजे प्रत्येक महिन्यात कॅन्सर,डायबेटीस, किडनी अशा गँभिर आजाराचा रुग्ण त्यांचे नातेवाईक भेटत होते, मदत मिळवून देण्यासाठी विनंती करत होते. या अस्वस्थ करणाऱ्या कारणांचा शोध शेतातील पिकावर मारा होत असलेले विषारी औषध हे असल्याचे स्पष्ट झाले. आणि सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
शेतीसाठी वेळेवर शेतमजुरांचा प्रश्न होताच मात्र स्वतः शेतीत राबून मोठया कष्टाने त्यांनी सेंद्रिय शेतीचा आदर्श उभा केला आहे.
या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडे असलेल्या येवला तालुक्यातील गवंडगव शिवारातील पावणेसात एकर पैकी 4 एकर बांबू लागवड केली.यापैकी बांबूच्या शेतीत 36 गुंठ्यांत सदाबहार पेरू लागवड केली आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील हा खूप सुंदर अप्रतिम प्रयोग आहे इथे मियावाकी फ्रुट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी आणि अल्ट्रा हायडेन्सिटी या पद्धतीने लागवड केलेली आहे.
36 गुंठ्यामध्ये दोन हजार सदाबहार पेरूंच्या रोपांची लागवड करून कमी क्षेत्रात जास्त झाडांचे रोपण करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावरती भर आहे.
या ३६ गुंठ्यांतील शुद्ध सेंद्रीय नारळ, बांबू, सदाबहार पेरू, सिडलेस लिंबू,काजू,हिरडा,बेहडा, आवळा,शेवगा,गवार, डांगर,भोपळा,मेथी, कोथिंबीर,घेवडा,अंजीर,केशर आंबा, आवाकोडो, ड्रॅगन फ्रूट, सफेद जांभूळ,फणस, मोहगनी,चंदन हे सर्वच असे विविध मिश्र फलझाड लावली आहेत.
अनुदानासाठी शासनाचे नियम अत्यंत किचकट आणि ac ऑफिस मध्ये बसून बनविल्यामुळे अनुदानाकडे दुर्लक्ष करून खर्चिक परंतु शाश्वत उत्पन्न देणारा हा प्रयोग अत्यंत धाडसाने त्यांनी केला आहे.
या प्रयोगामुळे.शेतीचा सेंद्रिय पोत सुधारणार आहे. यासाठी जीवामृत तयार करणारा 6 हजार लिटर क्षमतेचा हायटेक एन एरेबेटीक फुगा बसविला आहे. या अत्यंत शाश्वत उत्पन्न देणाऱ्या प्रयोगाला प्रारंभ झाला आहे.येवले तालुक्यात हा प्रयोग प्रथमच त्यांनी राबविला आहे. त्यांच्या या विषमुक्त शेती प्रयोगाची परिसरात चांगलीच चर्चा असून हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत आहे.त्यांनी शुद्ध गावरान भाजीपाल्यासाठी बिजमाता राहिबाई पोपारे यांच्याकडून विविध प्रकारचे गावठीबियाणेआणून शेतात लावले आहे. त्यांची शेती कृषी विभागातील अधिकार्याना आकर्षित करत आहे.यापैकी शेवगा,अंजीर, सिडलेस लिंबू,गवार,डांगर यांना फलही आली आहेत.त्यांची सेंद्रीय शेती अमाप कष्ट करून फुलवली असून लवकरच गवंडगाव शिवारात सर्वांना भुरळ पडणारे फलांचे जंगल साकारणार यात शंकाच नाही. त्यांच्या या प्रयोगाला आमच्याकडुन खूप शुभेच्छा,त्यांच्या सारखे प्रयोग गावोगावी होवो, विषमुक्त भाजीपाला,रसाळ फल खायला मिळो.याच सदिच्छा