नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणूक सुरु आहे. चार टप्प्यातील मतदान झाले आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. यात सिनेजगतातील मंडळी देखील मागे नाही, सिनेजगतातील मंडळी देखील आपले राजकीय मत खुलेपणाने व्यक्त करत आहे. दरम्यान आज दिल्लीत भाजपचे समर्थक सिने क्षेत्रातील दिग्गज मंडळी एकत्र जमली. ही गेट टू गेदर पार्टी होती. यात दिग्दर्शक बोनी कपूर, प्रसिद्ध नृत्यकलावंत सपना चौधरी, अभिनेते मनोज जोशी, खली आदी उपस्थित होते.
काही दिवसापूर्वी मोदींविरोधात ६०० कलावंत एकत्र झाले होते, तर मोदींच्या समर्थनार्थ ९०० पेक्षा अधिक कलावंत एकत्र झाले होते.