भुसावळ l येथे भारतीय जनता पार्टी, विधानसभा क्षेत्रातर्फे सावरकर गौरव यात्रेनिमित्त उद्या दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून पुन्हा सावरकर चौकात रॅलीचा समारोप होईल, तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेनिमित्त आयोजित या भव्य मोटारसायकल रॅलीस हिरवी झेंडी आमदार संजय सावकारे दाखवणार आहेत. या मोटारसायकल रॅलीत भाजपाचे शहर अध्यक्ष परिक्षित बर्हाटे, मा. युवराज लोणारी मा. नगरसेवक, रवीशंकर दुबे, माजी नगरसेवक गिरीश महाजन यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तरी बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन आ. सावकारे यांच्यासह भाजपा शहर अध्यक्ष परिक्षित बर्हाटे यांनी केले आहे.