भुसावळलात श्री लक्ष्मी व्यंकटेशव देवी देवतांच्या प्रतीमेची भव्य मिरवणूक

भुसावळ प्रतिनिधी l

पांडुरंग टॉकीज मागील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात – दि. १८ जून ते २० जून पर्यंत दररोज सकाळपासून तर सायंकाळी ९ वाजे पर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडले, या कार्यक्रमाला अनेक साधू संत महंत यांचे मार्गदर्शन लाभले श्री १००८ बालकस्वामीजी केशवाचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने सदरचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले हे मंदिराच्या कार्यक्रमाचे २६ वे वर्ष होते.

मंगळवार दुपारी ५ वाजता अष्टभुजा मंदिराजवळून श्री लक्ष्मी व्यंकटेश व अनेक देवी देवतांच्या प्रतिमा सजवून वाजत गाजत शेकडो बंधू भगिनींच्या उपस्थितीत शहराच्या प्रमुख रस्त्यावरून भव्य दिव्य मिरवणूक (शोभायात्रा) काढण्यात आली, ठीक ठिकाणी प्रतिमेची भक्तजण पूजा करून फुले व पाकळ्यांनी उधळण करून दर्शन घेत होते,

मिरवणूक ही जामनेर रोड, अष्टभुजा देवी मंदीर, गंगाराम प्लॉट, पोस्ट ऑफीस, अप्सरा चौक, सराफ बाजार, गांधी चौक नंतर बालाजी मदीरात मिरवणूकीचा समारोप झाला.

नंतर शोभायात्रा परत मंदिर परिसरात आली, महाआरती होऊन प्रसाद वाटण्यात आला, यावेळी सर्व समाजातील बंधू भगिनींनी उपस्थिती देऊन सहकार्य केले.

यावेळी अध्यक्ष व मंदिराचे ट्रस्टी राधेश्यामजी लाहोटी, ब्रिजमोहन अग्रवाल, दीपक काबरा, राजेंद्र चांडक, भवरलाल दरगड, मधुलता शर्मा,मिलिंद अग्रवाल,रामवल्लभ झंवर, राठोड, जी. आर, ठाकूर, जे. बी. कोटेचा, मनोहर जगवाणी, संजय लाहोटी, गोविंद हेडा, मयूर नागोरी, राजेश पारीख, संजय अग्रवाल, श्याम अग्रवाल, सुरेश अग्रवाल, राजेश लड्ढा, पिंटू हेडा, भगवान चांडक यांनी सहकार्य केले. मिरवणूकीत सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती.