योगातून निरोगी आयुष्य तर राजयोगातून इंद्रियांवर वर विजय मिळवून स्वराज्य अधिकारी बनण्याचा योग

भुसावळ

येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय सेवा केंद्र भुसावळ आयोजित 21 जून जागतिक योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सेवा केंद्राच्या संचालिका बीके सिंधू दीदी यांनी मार्गदर्शन करताना योगाच्या माध्यमातून आपण आपलं आरोग्य निरोगी जीवन जगू शकतो विविध आजारांपासून दूर राहू शकतो परंतु योगा बरोबर राजयोग केला तर या राज योगाच्या अनुभवातून शांती आनंद प्रेम निर्माण होऊन सर्व इंद्रियांवर विजय मिळवून इंद्रजीत होऊ शकतात आणि स्वराज्याचा अधिकारी बनू शकता .राज योगाच्या माध्यमातून देशात जगात शुद्ध व्हायब्रेशन द्वारे सुंदर भारत स्वच्छ भारत स्वर्गमय भारत पवित्र भारत निर्माण होऊ शकतो आपल्या सर्वांमध्ये शांती प्रेमभावना निर्माण होते .यासाठी सेवा केंद्र द्वारा सात दिवसाचा कोर्स विनामूल्य केला जात असतो असे मार्गदशन करताना त्यांनी सांगितले .
प्रमुख अतिथी म्हणून प्रसाद आंबेकर व राधिका आंबेकर यांनी श्वसन व प्राणायाम याविषयी मार्गदर्शन करून सूक्ष्म हालचाली चे प्रात्यक्षिक यांनी करून घेतले .यानंतर पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष व भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील सर यांनी योग दिनाच्या निमित्ताने काही योगासने व प्राणायाम भ्रामरी कपालभाती सूक्ष्म हातापायांचे व्यायाम करून कोणत्या प्रसंगी कोणते आसन करू नये असे शास्त्रीय पद्धतीने योगासने त्यांनी करून घेतले . यानंतर म्युझिकल योगा करण्यात आला .


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेडिटेशन करण्यात येऊन प्रमुख अतिथी चे स्वागत करून दिपप्रज्वलन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या शेवटी योग दिनाच्या निमित्ताने व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने एक रोप लावण्यात आले व सेवा केंद्रातील 350 सदस्यांमार्फत कल्पतरू अंतर्गत 14 ऑगस्टपर्यंत प्रत्येकी वृक्ष लावून संवर्धन करण्यात येणार आहे .असे याप्रसंगी सांगण्यात आले .या कार्यक्रमात चे सूत्रसंचालन बीके ज्योती बहन बी के कविता बहन यांनी केले .बीके मोहिनी बहन सुमन माता बि के अनिल शिंदे, कुकरेजा भाई, रितेश वाघोदे, नितीन पाटील ,भरत भाई, प्रभाकर भाई, कुशवाह भाई तसेच पर्यावरण जागर चे संचालक सुरेंद्र सिंग पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वी साठी सहकार्य केले