तालुक्यातील मुडावद येथे पांझरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाची आ.जयकुमार रावल यांनी केली पाहणी, पादचारी पुलाचे काम एक महिन्यात होणार पूर्ण.

शिंदखेडा (प्रतिनिधी)पाच कोटी रुपये खर्च करून शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे कपिलेश्वर महादेव मंदिरावर जाण्यासाठी पांझरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाच्या कामाची पाहणी माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांनी केली. कोरोना काळात या पुलाचे काम जलद गतीने होत असून येत्या महिन्याभरात हा पादचारी पुल पूर्ण होऊन भक्तांसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती आमदार जयकुमार रावल यांनी दिली

मुळावर येथील कपिलेश्वर मंदिरावर जाण्यासाठी पांझरा नदीवर पूल बांधण्यात यावा अशी अनेक वर्षापासून ची मागणी भक्तांची होती. आमदार जयकुमार रावल मंत्री असताना त्यांनी या पुलासाठी 5 कोटी 10 लाखाचा निधी मंजूर करून केला होता. त्यानंतर कोरोना काळ आणि तापी नदीचे बॅक वॉटर मुळे याठिकाणी काम करताना मोठ्या अडचणी येत होत्या. वर्षात केवळ 3 आठवडे काम करता येत होते. परंतु नदीपात्रातील या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे पुढील काम तातडीने व्हावे म्हणून त्यांनी पुलाच्या होत असलेल्या कामाची पाहणी केली.

मुडावद गावाच्या जनतेने माझ्याकडून पांझरा नदीवर पूल बांधून कपिलेशश्वर महादेव मंदिरावर जाण्याची सोय करावी अशी मागणी केली होती त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून विशेष बाब म्हणून पुलच्या कामासाठी निधी मागणी केली परंतु कमी लोकसंख्या असल्याने मोठी अडचण येत होती परंतु कपिलेशश्वर महादेव मंदिर हे लाखो लोकांचे श्रद्धस्थान असल्याने हा निधी सर्व काम जलद गतीने होत असून अडचणीवर मात करून आणला होता सन2019 पासून हे काम सुरू आहे परंतु अखेर हे काम आता पूर्णत्वास येत असून येत्या काळात पुलाचे काम दर्जेदार व्हावे गुजरातमध्ये ज्या प्रकारे दुर्घटना घडली होती तशी घटना होऊ नये त्यासाठी सर्व काळजी घेऊन पुलावर सुविधा निर्माण करणयात येऊन महिन्याभरात या पुलाचे काम पूर्ण करावे म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी जाण्याआधी हा पूल भाविकांना खुला होईल त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे अशा सूचना यावेळी दिल्यात.

यावेळीं बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जि प चे माजी सदस्य सपना वारुडे, नथा वारुळे, डी आर बोरसे,अरुण पाटील, भाजपा महिला मोर्चाच्या माधुरी सिसोदे, उपअभियंता संजय सुर्यवंशी, शाखा अभियंता चेतन देवरे, विवेक थोरकर, ठेकेदार दीपक जैन, मुडावदचे सरपंच सुरेन्द्र चौधरी, दिलीप पाटील, सुभाष सोनवणे, खंडेराव महाजन, भानुदास महाजन, सुरेश पवार, मंगेश सोनवणे, राकेश पवार, नाना चौधरी, जगन्नाथ तामखाने, मुरलीधर चौधरी, देवमन बोरसे, दिवेश वारुडे, निखिल सिसोदे, विनीत सिसोदे आदी उपस्थित होते.