भुसावळ प्रतिनिधी ।
शहरातील जामनेर रोडवरील वांजोळा परिसरातील रस्त्याच्या लागून तिसरे शेतात कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याने तो विहिरीच्या कपरात बसून आहे. याला हजारो महिला – पुरुष तसेच बाल गोपालांनी बघण्यासाठी गर्दी केली. रस्तावर वाहने लावून बिबट्याला बघण्यासाठी जाणाऱ्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हाकेच्या अंतरावर उपविभागीय पोलीस अधिकारी व तालुका पोलीस स्टेशन आहे. तीन ते चार किलोमीटर अंतरावर वनविभागाचे कार्यालय असल्यानंतरही एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नाही .
हजारोच्या संख्येने गर्दी जमल्याने बिबट्या कदाचित विहिरीच्यावर आल्यास आठ ते जणांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित अधिकारी बळी जाण्याची तर वाट पाहत नसावे, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.