भडगाव येथे मोठ्या आवाजात डी.जे. वर पोलीस स्टे.ची कारवाई

भडगाव (प्रतिनिधी)
आगामी काळात येणा-या सणोत्सवमध्ये डी.जे.सारखे वादय न वाजवता पारंपारीक वादय वाजवून सण साजरे करणेबाबत पोलीस प्रशासनाकडुन वारंवार सूचना देवूनही कर्कश आवाजाचे डी. जे. वाजवून सार्वजनिक शांतता बिघडवणा-या विरुध्द भडगांव पोलीसांची कारवाई.

दि.18/9/2023 रोजी रात्री 10.30 वा. सुमारास भडगांव शहरातील बाळद रोड येथे डी. जे. लावुन मोठ्या आवाजात मिरवणुक सुरु असताना मा. सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगांव श्री. अभयसिंह देशमुख साहेब, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सदर ठिकाणी अचानक येवुन सदरचा गाडी क्र.MH 43 8058 ही डी.जे.ची गाडी पकडून भडगांव पोलीस स्टेशनला आणुन पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक डोमाळे यांनी सदरबाबत परिवहन कार्यालय, जळगांव विभागाशी आवश्यक पत्रव्यवहार केला असता त्यांचेकडून डी.जे. मालक तुषार पाटील व राकेश बाग दोघे रा. भडगांव यांना रुपये 44,000/- इतका आर्थीक दंड करण्यात आला आहे.

तरी सर्व गणेश मंडळ तसेच डी.जे. धारक यांना भडगाव पोलीस स्टेशनकडुन सुचना व आवाहन करण्यात येत आहे की, सार्वजनिक मिरवुणकी मध्ये कसल्याही प्रकारचे डी.जे.न वाजवता पांरपारीक वादय वाजवून सार्वजनिक शांतता राखावी,