रावेरला बारागाड्या ओढतांना मोठा अनर्थ टळला

रावेर प्रतिनिधी ।

शहरात अक्षय तृतीयानिमित्त दरवर्षीप्रमाणे बारागाड्या ओढत असतांना मोठा अनर्थ टळला आहे. ठरलेल्या रूटवरून गाड्या दुसऱ्याच रूटकडे वळल्याची घटना घडली. त्याची रावेर शहरात एकच चर्चा होती.

रावेर शहरतील छत्रपती शिवाजी चौक परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अक्षय तृतीयानिमित्त बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी भगत म्हणून बाळु महाजन तर बगले म्हणून जिवन महाजन दीपक पाटील बारा गाड्या हे सहायक होते. ओढत असतांना संत तुकाराम महाराज मंदीरजवळ बारागाड्याने रूट बदलुन दुसऱ्या दिशेला जात असल्याचे लक्षात येताच आयोजकांनी सर्व गाड्या थांबविल्या. परत मागे ओढुन पूर्वीच्या रूटवर ओढण्यात आल्या.

यावेळी बारागाड्यावर बसलेल्या युवकांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, गणेश महाजन, भावलाल महाजन, अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता डी. डी. वाणी, शैलेंद्र अग्रवाल, समाधान महाजन, किरण माळी, रजनीकांत बारी आदींनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी चोख पोलिस बंदबस्त ठेवला होता.