सावदा येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न । 10 जोडपे विवाहबद्ध

सावदा (प्रतिनिधी) – आसेम तर्फे आयोजीत आदिवासी तडवी भिल्ल जमातीचा 26 वा सामुहिक विवाह सोहळा सावदा येथे मोठ्या उत्साहात दि 14 मे 2023 रविवारी संपन्न झाला. यावेळी आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी आ. शिरीष दादा चौधरी तर विशेष अतिथी म्हणून. मा.अनिल भाऊ चौधरी प्रहार विभाग प्रमुख, मा. राजु अमिर साहेब शिक्षणाधिकारी मुंबई, मा. विनीताजी सोनवणे आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी होते, प्रमुख उपस्थितीत मा. राजेश भाऊ वानखेडे, मा. विवेक ठाकरे सर,मा.अनिल शावखा साहेब, मा.नजमाताई इरफान तडवी, मा.आशाताई रफीक नाशिक, मा. नंदाताई लोखंडे, सुत्र संचालन मा. सलीम सर व अनिल गुरूजी यांनी केले व प्रस्तावना आसेमं संस्थापक राजु बिऱ्हाम यांनी केली. एकुण 10 जोडप्यांचा विवाह संपन्न करत आज तागायत 26 वर्षात 1820 आदिवासी जोडपे विवाह बद्ध झालेले आहेत. याप्रसंगी समाज जोडो पदयात्रेकरूनचा जंगी सत्कार करण्यात आला व तडवी संस्कृती जतनसाठी “निवडा” शॉर्ट फिल्म च्या कवी /कलावंतांनचा सत्कार करण्यात आला. समाजाला आज सामुहिक विवाह सोहळ्यांची गरज असुन युवा पिढीने आपले विवाह अश्याच ठिकाणी करावेत असे विचार मा. शिरीष दादांनी मांडले व मा. विनीताजी सोनवणे यांनी विचार मांडतांना आदिवासी समाजाने अनेक शासकीय योजनांनचा लाभ घेऊन आपला घडवावा, तर मा. राजु अमिर साहेब यांनी 1820 जोडप्यांचे सत्कार करण्या करीता आसेमं परिवार तर्फे माहामेळावा आयोजित करण्या संबंधी मार्गदर्शन केले. या प्रसंगी संजु जमादार, हनिफ अप्पा, रोशन हसन, मनोज जमशेर सर, शरीफ आझाद साहेब,हाजी रमजान अमिर, फकिरा सिकंदर सर,अनवर भिकारी साहेब नाशिक, रमजान शालम साहेब, कामील शेठ, राजु इब्राहिम साहेब, सत्तार दादा दहीगाव, हसन जमादार, मजित अप्पा,मासुम भाई पत्रकार, राजु भाऊ चौधरी, मुस्ताक भाई मुंबई, सै.अजगर नगरसेवक, मुबारक फत्तु,जे.के.शेठ, रफीक दादा नाशिक, शरीफ मासुम सर, गनी सर,सुभान समशेर वडगाव, अशपाक जलदार,जावेद इस्माईल सर, सलीम भुरेखा दादा,सलीम LIC, राजु तुराब,सलीम इस्माईल पोलीस, अफजल अरमान पोलीस, सिकंदर दादा मोरव्हाल, राजु फकीरा सांगवी,यांच्या प्रमुख उपस्थिती होती तर आयोजक मा. इरफान सर, अशरफ अप्पा, फिरोज बिऱ्हाम न्हावी, रज्जाक अमिर, जुम्मा उस्मान, हबीब अब्बास, समशेर मिस्तरी, मायकल तडवी, पिंटु कोतवाल, अल्ताफ समशेर, बिराज कवी, न्याजोद्दीन वेंडर, जमशेर पोस्ट मास्टर, सिराज सर, लुकमान डाक्टर, गफुर जनाब, मुबारक गुरूजी, हाजी सचिन, उस्मान रमजान,नुरखा बलदार पेंटर, मन्सूर सबाज, गोंडु भाई, गफ्फार मेंबर, वसिम मैबुब,साबीर सुपडू,छोटु सिकंदर, राजु छबु,नशिर नजीर, एफ.आर.तडवी, मुसा गुरूजी, सुभेदार इमाम, नाशिर भाई यावल, गणी भाई जलगांव, यांनी सहकार्य केले

तर स्थानिक आसेमं युवा कमेटी ने अहोरात्र मेहनतीने कार्यक्रम यशस्वी केला यात मोहसिन राजु,गुडा हुसेन,हैदर अकबर, वसिम राजु, अशफाक युनूस, शेरू सायबु, आशिष राजु, पिंटु बाबु,जुनेद साबीर, समीर मयबु, राहुल बडगे, बाबा मोमीन, राजीब मोमीन, आवेश सर्फराज, अर्शद अबजल,अजय मेढे, रफीक सलीम, रोशन नबाब असंख्य कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतली.