नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचे सर्व तप्पे संपले आहे. दोन दिवसावर निकाल येऊन ठेपला आहे. निकालाबाबत एक्झीट पोल आले आहे. त्यात एनडीएला बहुमत मिळणार असल्याचे दिसून येते. दरम्यान मोदीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहे. एनडीएची सत्ता नाही आली तर महाआघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी पूर्व तयारी सुरु आहे. त्यासाठीच आज दिल्लीत प्रमुख विरोधी पक्षांची बैठक घेण्यात आली. मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये गडबड झाल्याच्या मुद्यावर ही बैठक झाली. बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद, सीपीआयचे सीताराम येचुरी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आदी उपस्थित होते.