एक कॅमेरा पोलीसांसाठी या योजनेचे अंमलबजावणी बाबत बोदवङ पोलिस निरीक्षक राजेंद्रजी गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात सराफा एसोसिएशनची बैठक घेण्यात आली.
एक कॅमेरा पोलीसांसाठी या योजनेचे अंमलबजावणी बाबत बोदवङ पोलिस निरीक्षक राजेंद्रजी गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात सराफा एसोसिएशनची बैठक घेण्यात आली.
बोदवड प्रतिनिधी l
विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशानुसार”एक कॅमेरा पोलीसांसाठी ही योजना पो.स्टे. स्तरावर राबविणे संदर्भात कळविण्यात आलेले आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी पोलिस निरीक्षक राजेंद्रजी गुंजाळ यांनी सराफा बांधवांची बैठक घेत त्याना मार्गदर्शन केले. तसेच अज्ञात व्यक्ति कडून सोने चांदी विकत घेताना,त्यावर संशय आल्यास त्वरीत पोलिसांना कळवण्या बाबत सूचना केल्या.
अनेक वेळा व्यापारी हे आपल्या दुकानात कॅमेरे बसवतात परंतु त्या कैमेराचे कार्यक्षेत्र दुकाना पुरतेच मर्यादित ठेवतात या मुळे एखाद्या वेळा अनुचित घटना घडल्यास पोलिसांना तपासकामी अडथळा निर्माण होतो.म्हणुन आपल्या दुकानातील किंवा दुकाना बाहेरील एक कॅमेरा पोलिसांसाठी म्हणुन सेट करण्यात यावे जेने करुण आपल्या सुरक्षेसह गुन्हा घडल्यास गुन्हेगारांवर वचक बसन्यास मदत होईल या बाबत
बाजरपेठेत व्यापारी बाँधवानी सूचना लक्षात घेत एक कॅमरा पोलिसांसाठी या नुसार सहकार्य करावे याबाबत सूचना दिल्या.