स्वामी समर्थ केंद्रात एक दिवसीय बाल संस्कार शिबीर उत्साहात

विविध केंद्रातील पाचशे विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

जळगाव । शहरातील रामेश्‍वर कॉलनी भागातील श्री स्वामी समर्थ केंद्रात शहरातील विविध केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबीर नुकतेच उत्साहात घेण्यात आले. शिबिरात रामेश्वर कॉलनी, प्रताप नगर, आनंद नगर, कांचन नगर, मुकुंद नगर, अयोध्या नगर, इंद्रनील आणि कुसुंबा केंद्रातील पाचशेच्या जवळपास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. प्रमुख पाहूणे म्हणून जळगाव जिल्हा प्रमुख विजय निकम, रामेश्‍वर कॉलनीचे केंद्र प्रमुख एन.डी.बोरसे, एस.के.परखड, बी.एच.काळे, वसंत पाटील यांच्यासह बालसंस्कार केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना कैलास वाणी, मनिषा चव्हाण यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

शिबिरात 18 विभागांच्या माहितीसह मार्गदर्शन
शिबिरात विद्यार्थ्यांसाठी लिंबू चमचा, स्मरणशक्ती विकास स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रश्‍नमंजुषा, स्तोत्र व मंत्र पठण आदी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासोबतच पालकत्व, शिशु संस्कार, गर्भसंस्कार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच सणवार व्रत, वैकल्य आणि आपल्या 18 विभागांची माहिती शिबिरात देण्यात आली. शिबिराचे नियोजन अमोल वाघ, वासुदेव बडगुजर, सिध्देश चौधरी यांनी केले होते.

यशस्वीतेसाठी बालसंस्कार केंद्रांचे प्रतिनिधी प्रसन्न पाटील, नेहा मंत्री, भूषण वाघळे, ईश्‍वर चौधरी, जयंत शिंदे, भाग्यश्री परातणे, कोमल पाटील, सुचिता पाटील, स्नेहल गांगुर्डे, काजल तायडे, आनंद केंद्र, यामिनी फेंगडे, अजिंक्य मुळे, कौस्तुभ धांडे, राहुल खैरनार यांच्यासह सर्व सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने शिबिराचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचलन तथा आभार अमोल वाघ यांनी मानले.