शहादा: अक्कलकुवा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे कर्तव्यावर कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास ग्रामसभेत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ एक दिवशीय धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक शहादा तर्फे पंचायत समिती आवारात करण्यात आले सदर घटनेच्या निषेध नोंदवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामसेविका मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
याबाबत सविस्तर वृत्त ग्रामपंचायत ब्राह्मणगांव ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे कर्तव्यावर असलेले ग्रामसेवक बांधवास घरकुल विषयावरुन ग्रामसभेत मारहाण झालेली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी घरकुल विषयावरून ग्रामपंचायत रामपूर ता. अक्कलकुवा येथे देखील एका ग्रामसेवक बांधवावर खोटे अन्यायकारक गुन्हे दाखल झालेले आहेत.
तसेच ग्रामसेवक बांधवावर नेहमीच अन्याय होत असून ते कर्तव्यावर असतांना त्यांना ग्रामसभा सुरु
असतांना मारठोक करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हे सतत होत असलेले हल्ले आहे.
यामुळे ग्रामसेवक बांधवांना त्यांच्या पदावर कार्य करणे अतिशय जिकरीचे झालेले असून यामुळे त्यांच्या जिवितास देखील धोका निर्माण झालेला असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून कर्मचाऱ्या झालेली मारहाण ही निंदनीय असून शासनाने गंभीर दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले असून सदर निवेदन हे शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना देण्यात आले आहे या एक दिवशी धरणे आंदोलनात शहादा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने शांततेच्या मार्गाने काळ्या फिती लावून शुक्रवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. यात महाराष्ट्र राज्य संघाचे जिल्हाध्यक्ष हिम्मत वंजारी, मानद अध्यक्ष शरद पाटील, तालुकाध्यक्ष कुवरसिंग नाईक, तालुका सचिव रवींद्र पंडितशिरसाट, जिल्हा कोषाध्यक्ष नारायण पवार, मनोहर खर्डे, बीपी गिरासे, अनिल कुवर, रमेश बर्डे, प्रकाश निकम, मनोहर महिरे, राजेंद्र आगळे आदींसह शहादा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक कर्मचारी सहभागी झाले आहेत.