या राजकीय पक्षाचा मला मारण्याचा कट-ममता बॅनर्जी

0

कोलकाता – एका राजकीय पक्षाने राजकीय फायदा मिळविण्याच्या हेतूने त्यांना मारण्याचा कट आखत आहे. एवढेच नाही, तर यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारीही देण्यात आली आहे, असे दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला आहे. मात्र यासंदर्भात त्यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा म्हणाल्या, मला माहीत आहे की, एक राजकीय पक्ष मला मारण्याचा कट आखत आहे. यासाठी त्यांनी सुपारीही दिली आहे.

कॉन्ट्रॅक्ट किलरला अॅड्व्हान्सदेखील देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर माझ्या घराची आणि कार्यालयाची टेहाळणीदेखील करण्यात आली आहे. कटकारस्थान करणाऱ्यांनी स्वर्वप्रथम माझे चरित्र हनन करण्याचा कट आखला आहे. त्यानंतर ते मला रस्त्यातून बाजूला करतील. मात्र, मला अशा प्रकारच्या कटकारस्थानांची सवय झालेली आहे. यापूर्वीही मी अशाच एका प्रकारातून वाचली आहे, असेही ममता म्हणाल्या.