रस्ता नसल्याने महिलेला प्रसूतीसाठी ६ किलोमीटर पायी नेले रुग्णालयात

0

कोठावासला: सरकारकडून प्रत्येक गाव-खेडे रस्त्याने जोडले गेल्याचे गप्पा मारल्या जातात, मात्र अद्यापही अशी अनेक गावे आहेत, जी रस्त्याने जोडली गेली नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे. विशाखापट्टणम राज्यातील कोठावासला या गावातील एका महिलेला प्रसूतीसाठी ६ किलोमीटर पायी न्यावे लागले आहे. एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात गावातील काही माणस आणि महिलांनी मिळून कापडाची एक झोळी केली असून त्यात महिलेला घेऊन दुसऱ्या गावात रुग्णालयात नेत आहेत. गाव-खेडे रस्त्याने जोडली गेल्याचा दावा फोल ठरत असल्याचे यातून दिसून येते.