न्हावी l
फैजपुर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच परिसरातील पोलीस पाटलांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक गावा निहाय माहिती जाणून घेऊन गावातील कायदा सुव्यवस्था राखणे कामी पोलीस पाटलांची मोठी जबाबदारी असून याबाबत वाघ साहेबांनी मार्गदर्शन केले तसेच कुठल्याही गुन्हेगारा ची गय केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांतर्फे साहेबांचे स्वागत करण्यात आले यावेळी गोपनीय विभागाचे राहुल चौधरी. योगेश दुसाने पोलीस पाटील सुरेश खैरनार. निलेश सोनवणे .नरेंद्र मासोळे. तुषार चौधरी. प्रसन्न पाटील. विशाल जवरे. दिनेश बाविस्कर. कैलास बादशाह. हरीश चौधरी. पुरुषोत्तम पाटील. संजय चौधरी. प्रफुल्ला चौधरी. रवींद्र सावळे. सह सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.