जळगाव प्रतिनिधी ।
शहरात मुसळधार पावसामुळे शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून अनोळखी सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या चार दिवसांपासून उन्हाळ्यातही पावसाळ्याची अजब अनुभूती येते आहे. त्याचे कारण म्हणजे दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वादळ, पाऊस आणि ढगाळ वातावरण असे चित्र निर्माण होत आहे.
शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा शहराला जोरदार तडाखा बसला. पाऊस सुरू असताना शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळ एक
शिवाजीनगरातील घटना; पोलिसात नोंद सुरक्षारक्षक सायकलसह उभा होता.
पावसाच्या तडाख्याने अचानक जिनिंगची भिंत कोसळली. या भिंतीच्या ढिगाराखाली दबून त्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. हा प्रकार आजू-बाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच त्या सुरक्षा रक्षकाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यानंतर रिक्षातून जिल्हा रूग्णालयात नेले.
अद्याप त्या सुरक्षा रक्षकाची ओळख पटलेली नसून त्यांच्या नातेवाईकांचा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रवींद्र सोनार हे शोध घेत आहेत. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकाच्या शर्टावर सत्यनारायण सिक्युरिटी अॅण्ड मॅन पॉवर सिर्व्हिसेस असे लिहिलेले आहे.