मुक्ताईनगर :-(प्रतिनिधी)
: समस्त बौद्ध समाज मुक्ताईनगर तालुका मार्फत नांदेड जिल्ह्यातील बोंडारा हवेली येथील रहिवासी अक्षय श्रावण भालेराव या युवकाची दिनांक 3 /6 /2023 रोजी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढली म्हणून निर्घुण अशी जातीय मानसिक स्थितीतून माणुसकीला काळींबा फासणारी व मन हे लावून टाकणारी क्रूर हत्या करण्यात आली व सोबत त्यांच्या आई-वडील भाऊ आणि समाज बांधव यांना देखील मारहाण केलेली असून गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का काढली हा राग काही समाजकंटक युवकांनी मनात धरून त्याच्यावर खंजीरने वार करून पोटातले आतडी बाहेर निघेपर्यंत वार केले व त्याला जीवे ठार मारून जातीवाचक शिवीगाळ केली .
तरी या प्रकरणी सदर घटनेतील आरोपी त्यांच्यावर येथील पोलीस प्रशासनाने अटक करून योग्य प्रकारे कायद्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करून घेतले आहे त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे तरी या पुढे असे कृत्य जातीय मानसिकतेतून कोणीही करू नये म्हणून त्यामध्ये दोषी असणाऱ्या समाजकंटकांना फाशीची कठोर शिक्षा कायद्याने मिळावी व ॲट्रॉसिटी दाखल व्हावा पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण व आर्थिक मदत मिळावी अशी विनंती संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यातील बौद्ध समाजाचे बांधव व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी तहसीलदार शेव्ता संचेती पोलीस उप अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करून दिलेले आहे निवेदनावर खालील कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत अमोल बोदोडे सम्राट बोदोडे नाना बोदडे पृथ्वीराज बोदोडे अनमोल बोदडे अजय शेलार मनोज इंगळे शैलेश गुरचळ प्रणेश जयकर प्रवर्तन बोदडे सुरेश गुरचळ रितेश बोदडे शुभम भालेराव सागर जयकर निखिल बोदडे दीपक मोरे आशिष बोदडे नीरज मेढे उमेश बोदडे आकाश बोदडे अविनाश बोदोडे किरण बोदडे आदींच्या सह्या आहेत.