पाकिस्तानी कारवायांना ‘मूहतोड’ जवाब

0

नवी दिल्ली – भारतीय सीमारेषेवर सुरू असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतींना भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेला पाकिस्तानचा बंकर भारतीय सैनिकांनी उद्धवस्त केला. भारतीय सैन्याने कारवाईचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. त्याला प्रत्युतरादाखल भारताने कारवाई करत चोख प्रत्युत्तर दिले. १९ मे रोजी भारतीय सैन्याने ही कारवाई केली. पाकिस्तानच्या हल्ल्यात एका बीएसएफ जवान शहीद झाला होता. तर चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीर भेटीच्या एक दिवसापूर्वी हा हल्ला करण्यात आला होता.