शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सचा दमदार विजय
गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला 31 मार्च शुक्रवार रोजी (IPL 2023) पाच बळी राखून हरविले. गुजरातच्या घरी नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या मॅच मध्ये भारताचे दोन तरुण फलंदाज शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांची उत्तम कामगिरी झाली. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच शंका नंतर सी एस के चा कर्णधार एम एस धोनी हा खेळतो का नाही असा प्रश्न होता. परंतु नाणेफेक च्या वेळी आल्याने हे कळाले की तो संपूर्ण सामना खेळेल.
पहिली फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स चा देवान कॉन्वे (1) हा स्वस्तातच उडाला. परंतु त्याचा सलामी वीर जोडीदार ऋतुराज गायकवाड उत्तम कामगिरी 92 धावा काढल्या. मोहीम आली (23), बेन स्टोक्स (7), अंबाती रायडू (12), रवींद्र जडेजा (1), शिवम दुबे (19) यांचे थोडे थोडे योगदान होते. कर्णधार धोनीने शेवटच्या षटकात एक षटकार आणि चौकार मारून चेन्नईला 178 पर्यंत पोहोचवले. गुजरात कडून मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ या तिघांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले. सी एस के च्या फलंदाजीच्या वेळी गुजरात टायटन्सचा मुख्य फलंदाज केन विल्यम्सन याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. पुढचे रिपोर्टच तो किती वेळ बाहेर असेल हे सांगतील. सुरुवातीच्या आणि मधल्या षटकांमध्ये चेन्नईने चांगली फलंदाजी केली परंतु शेवटच्या षटकांमध्ये त्यांनी स्वतःचे बरेच विकेट्स गमावले म्हणून स्कोर कार्डवर स्कोर कमी राहिला.