वाघाडी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्ट्यासह एकास केले जेरबंद

 शिरपूर –  तालुक्यातील वाघाडी येथून धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्ट्यासह एकास जेरबंद करीत 4 जिवंत काडतुससह 57 हजराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई शनिवारी सकाळी केली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे मध्यप्रदेशातील व्यक्ती गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना शनिवारी सकाळी मिळल्यावरून एलसीबीच्या पथकाने शोध घेतला असता वाघाडी गावातील वाडी रस्त्यावरील अश्विनी बिअरबार समोर रस्त्यावर संशयित मिळून आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 50 हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल 2 हजार रुपये किमतीच्या 4 काडतुस व मोबाईल असा 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत संशयित सुखराम रेतम पवार वय 23 रा. मु.पो. रायचुल, ता. पानसेमल जि. बडवाणी यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.याप्रकरणी एलसीबीचे पोकॉ महेंद्र सपकाळ यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, धुळे प्रशांत बच्छाव,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील,पीएसआय योगेश राऊत,बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, संदीप सरग, चव्हाण, महेंद्र सपकाळ, मयुर पाटील, तुषार पारधी, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी आदींनी केली