राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे नागपूर येथे दोन दिवसीय निवासी शिबिर आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होणार – उमेश नेमाडे

जळगाव l

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल द्वारा सक्षम वक्ते, संघटक, प्रचारक व कार्यकर्ते तयार करण्याच्या हेतूने नागपूर येथे दोन दिवसीय निवासी शिबीर शनिवार दि. ०३ जून व रविवार दि. ४ जून २०२३ रोजी आयोजित केले आहे.

या शिबिराच्या समारोपाला देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे,

प्रमुख उपस्थिती

खासदार मा. प्रफुल्ल पटेल साहेब, विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब, ओबीसी नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, माजी मंत्री एकनाथ खडसे साहेब, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब उपस्थित राहणार आहेत,

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल ने हे शिबीर आयोजन करण्याचा मुख्य उद्देश

केंद्र सरकारची ओबीसी बाबतची नकारात्मक भुमिका, सुप्रीम कोर्ट व्दारा आरक्षणावरील निर्बंध व निकाल, सध्याच्या राजकिय घडामोडी अशा अनेक विषयापासून ओबीसी समाजाची घुसमट तसेच पक्ष संघटनेची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांचे विचार तथा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची विचार सरणी चांदा ते बांदा तळागळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सक्षम संघटक, प्रचारक वक्ते, कार्यकर्ते तयार करण्यासाठी ओबीसी सेल व्दारा आयोजित शिबीरात 80 टक्के असलेल्या ओबीसी बहूजनांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळे विचारांची देवाणघेवाण होणार असून आगामी निवडणूकीत ओबीसी कार्यकर्त्यांनी आपल्या खांदयावर पक्षाची धुरा सांभाळून भारतीय जनता पार्टीला परास्त करण्यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांची भूमीका महत्वाची असणार आहे त्यामूळे नविन ओबीसी तरुणांची फौज उभी करण्यात येणार आहे.

या शिबिरात राज्यातील अनेक प्रमुख वक्ते,तसेच आपले नेते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे,

तरी महाराष्ट्रातील ओबीसी सेल चे सर्व राज्य प्रतिनिधी,पदाधिकारी ,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी या दोन दिवसीय निवासी शिबिरासाठी उपस्थित राहावे,

या शिबिरासाठी सर्व जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील शिबिरार्थीची तसेच ओबीसीच्या विवीध घटकातील समाजसेवकांनी उपस्थित राहावे प्रमुख नावे मोबाईल नंबर सह पुढील तारीख 22 मे २०२३ पर्यंत नोंदविणे आहे, कारण या शिबिरात ठराविक आणि मुख्य पदाधिकारी यांनाच निमंत्रित करण्यात आले असल्याने त्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नोंद घेऊन तात्काळ आपले नाव 9823293993 या नंबर वर कळवावा,

शिबीराचे स्थळ – महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशिमबाग, नागपूर

वेळ – शनिवार दि. ०३ जून २०२३ रोजी

सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

रविवार दि. ४ जून २०२३ रोजी

सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत …

आयोजक – ओबीसी प्रदेशाध्यक्ष श्री ईश्वर बाळबुद्धे हे आयोजक आहे