शहाद्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची बर्थडे पार्टी शहरात चर्चेचा विषय

शहादा
शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात पशूंच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या वाढदिवसानिमित्त रंगीत संगीत ओली पार्टी करून सामिष्ट भोजनावर सहकार्यांसोबत रात्री उशिरापर्यंत ताव मारल्याने पशुपालकासह नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे या रुग्णालयात आपल्या पशुंना उपचारासाठी घेऊन येणाऱ्या पशुपालकांना योग्य ती वागणूक न देणाऱ्या व शासकीय नियमावलीच्या भंग करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर वरिष्ठ स्तरावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे

शासकीय कार्यालयात केवळ शासकीय कामे करण्यात यावी याव्यतिरिक्त कुठलेही खाजगी काम करू नये असा शासकीय नियम असतानाही या नियमाला केराची टोपली दाखवत शहाद्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची बर्थडे पार्टी शहरात चर्चेचा विषय झाला आहे शहरातील भर वसाहतीत शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय आहे लाखो रुपये खर्च करून अद्यावत साधन सुविधा शासनाने येथे तालुक्यातील जनावरांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत शुक्रवारी सायंकाळी या पशुवैद्यकीय रुग्णालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी झाली सायंकाळी सात वाजेपासून तालुक्यातील इतर पशुवैद्यकीय अधिकारी, औषधालयाचे मालक व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे सन्मित्र जमू लागल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती एरवी दिवसभर रुग्णालयात कोणीही हजर नसते व अचानक सायंकाळी गर्दी जमा झाल्याने नागरिकांमध्ये कुतुहल निर्माण झाले होते

रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठा बॅनर लावण्यात आला होता शेजारी संगीताची सोय करण्यात आली रात्री आठ वाजेच्या सुमारास यजमान पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सौभाग्यवतीने उपस्थिता समोर आपला कलाविष्कार साजरा केला आपल्या अधिकाऱ्याचा वाढदिवस असल्याने उपस्थितही त्यास मनमुरादपणे दिली जशी जशी रात्र चढू लागली तसा तसा पार्टीत रंग भरू लागला कालांतराने तेथे सोमरसाची व्यवस्था करण्यात आली होती. येथेच जलपान झाल्यानंतर उपस्थितानी शाकाहारी व मांसाहारी भोजनावर ताव मारला रात्री साडेअकरा पर्यंत संगीताच्या तालावर आरडाओरड करीत उपस्थितानी आपल्या लाडक्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला ओली पार्टी करत असताना यांना आपण शासकीय कार्यालयाच्या परिसरात आहोत या ठिकाणी शासकीय नियमानुसार मद्यपान धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे अन्यथा अशांवर आर्थिक दंडासह फौजदारी कारवाई केली जाते याचे भान सुद्धा कोणालाच नव्हते खुद्द अधिकारीच आपल्या धर्मा पत्नीसह वाढदिवसानिमित्त जमलेल्यांचे मनोरंजन करत असल्याने त्यास कोणीही हरकत घेतली नाही शासकीय नियमांचे भंग करून पोलीस पार्टी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ स्तरावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे

या संपूर्ण प्रकाराबाबत संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रुग्णालयात गेले असताना तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की साहेब आज आलेले नाहीत दिवसभरापासून ते कोणाचा फोनही स्वीकारत नाही काल जे काही घडले त्याबाबत आपण साहेबांनाच विचारा अशी प्रतिक्रिया उपस्थित कर्मचाऱ्याने दिली