जळगाव l कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे दिनांक 11 आणि 12 एप्रिल 2022 या दिवशी दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .
सदरील कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थाने प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी सर ( सचिव धनाजी नाना विद्या प्रबोधनी जळगाव ), मा. राजेंद्र ननवरे ( कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल निर्वाचित अभ्यास मंडळावर सदस्य) माननीय भानुदास येवलेकर ( कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल निर्वाचित अभ्यास मंडळावर सदस्य), माननीय दिनेश चव्हाण ( कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल निर्वाचित अभ्यास मंडळावर सदस्य) , प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे ( शिरीष मधुकरराव चौधरी कला विज्ञान महाविद्यालय जळगाव.) प्राचार्य डॉ. राकेश चौधरी सर,डॉक्टर निलेश चौधरी (कार्यशाळा समन्वयक) . आणि डॉक्टर नितीन बडगुजर (कार्यशाळा सह समन्वयक), डॉक्टर प्रशांत भोसले आय. क्यू. ए. सी. चेअरमन, इत्यादी विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी सर यांनी कार्यशाळेचे आयोजन का करण्यात आले आहे त्याचे स्पष्टीकरण केले. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करताना विद्यार्थ्यांना लिंगभाव समानता हा विषय समजावा तसेच आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व समस्या याच्या प्रश्नांची उत्कल करता यावी हा या कार्यशाळेच्या आयोजना चा उद्देश आहे. असे त्यांनी निर्देशित केले. विशेष करून या कार्यशाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांनाच सहभाग जास्त नोंद करायला लावला आहे. असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले सध्याच्या कार्यशाळेसाठी जवळपास 120 विद्यार्थी आज सहभागी असल्याचे दिसत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
सदर कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून मनोगत व्यक्त केल्या
माननीय राजेंद्र ननवरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनेक दाखले दिले. देशातील पूर्वीच्या कालावधीमध्ये नारी यांना पूजनीय आणि नारीशक्ती असे महत्त्वाचे ठिकाणी स्थान होते . सध्याच्या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी क्रांतीसुर्य सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी जर क्रांती पेटवली नसती. तर आजच्या महिला कदाचित घडल्या नसत्या. राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या महिला, प्रधानमंत्री होणाऱ्या महिला आणि कित्येक पद भूषविणाऱ्या महिला , अंतराळामध्ये झेपावणाऱ्या महिला या निर्माण झाल्या नसत्या . असे मत त्यांनी व्यक्त केले. आदिशक्ती म्हणून महिलांना ओळखले जाते. असे त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या कालखंडामध्ये महिलांना अतिशय सन्मानाचे स्थान होते. यामध्ये त्यांनी रामायण, महाभारत, अगस्ती मुनी इत्यादींच्या महिलांच्या संदर्भात दाखले दिले . परंतु सध्याच्या कालावधीमध्ये महिलांना अभय प्राप्त होताना दिसत नाही. महिला ताट मानेने उभी राहिली पाहिजे. बलात्कार यासारखे अत्याचार यासारखे भेदाभेद यासारखे अनेक प्रकारच्या समस्या देशांमध्ये दिसत आहेत . कित्येक अल्पवयीन मुलीवरती बलात्कार होताना दिसत आहेत . कोणत्याच स्वरूपाचे भेदभाव होऊ नये म्हणून आपण लिंगभाव समानता हा विषय आपल्या विद्यार्थ्यांना समजावा याकरिता आपण राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे हे कौतुकास्पद आहे..विद्यार्थ्यांमुळे गुजावा हा हेतू चांगलाच आहे असे त्यांनी सांगितले .
त्यानंतर अध्यक्ष समोर प्रसंगी डॉ. पी.आर. चौधरी सर यांनी आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना लिंगभाव समानता याविषयी सखोल मार्गदर्शन व्हावे. तसेच आजचा विद्यार्थी हा भविष्यातला सुज्ञ नागरिक बनणार आहे . त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनीच सर्वप्रसंगी सहभाग नोंद करावा अशा गोष्टी वेळोवेळी कल्याणकारी गोष्टी यामध्ये सहभाग घ्यावा क्षेत्र कार्यामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन देशाचा विकास कसा होईल. याकडे आपण लक्ष केंद्रित करावे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज जयंती दिवस आहे. त्यामुळे लिंगभाव समानता हा विषय आजच्या दिवशी खूपच समर्पक आहे. असे प्रतिपादन डॉक्टर प्रमोद चौधरी सर यांनी केले .
त्यानंतर डॉ. नितीन बडगुजर सर यांनी कार्यशाळेचे उद्घाटन सत्राचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉक्टर कल्पना भारंबे मॅडम यांनी केले .
साधन व्यक्ती म्हणून माननीय थिटे साहेब हे लाभले होते . दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये मुंबई येथील मावा संस्थेचे पदाधिकारी माननीय थिटे सर यांनी दिवसभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . काही खेळ सुद्धा घेतले. खेळाच्या माध्यमातून लिंगभाव समानता कशा स्वरूपाचे आहे. हे त्यांनी दाखवून दिले तसेच काही शॉर्ट फिल्म सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवल्या की ज्यामधून लिंगभाव समानता हे काय आहे हे त्यांना सर्वांना समजले पाहिजेत असे त्यांनी सांगितले .
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समता रॅलीमध्ये समाजकार्य महाविद्यालयांचे सहभाग
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जळगाव आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
समता दिंडी व रॅलीचे आयोजन जळगाव शहरामध्ये करण्यात आले .
या कार्यक्रम प्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी सर यांनी समता रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले . त्यानंतर दिंडे जी.एस. ग्राउंड येथून महात्मा ज्योतिबा फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत समता रॅलीचे आयोजन केले. याप्रसंगी अनेक समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी तसेच इतरही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समता दिंडीमध्ये सहभाग नोंदवला.
सदर रॅली प्रसंगी माननीय आयुक्त योगेश पाटील सर (सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय भवन जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन केले. या कार्यक्रम प्रसंगी जळगाव शहरातील महापौर माननीय महाजन मॅडम तसेच माननीय विद्या गायकवाड मॅडम तसेच इतर अनेक पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला महापौर मॅडम तसेच तसेच विद्या गायकवाड मॅडम प्राचार्य डॉक्टर राकेश चौधरी सर तसेच मान्य योगेश पाटील सर सहाय्यक आयुक्त तसेच इत्यादी मान्यवरांच्या शुभ हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्याअर्पण करण्यात आले. तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले. आणि रॅलीचा समारोप केला. तसेच माननीय योगेश पाटील साहेब यांनी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे धन्यवाद व्यक्त केले आणि रॅलीचा समारोप केला . उपस्थित विद्यार्थ्यांना फराळ – खाऊ म्हणून देण्यात आला .
याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अशोक हनवते, (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) , डॉ. भारती गायकवाड (राष्ट्रीय सेवा योजना ) कार्यक्रमाधिकारी, डॉ. श्याम सोनवणे, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, डॉ. वाय. जी. महाजन, डॉ. निलेश चौधरी तसेच सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी यांनी समता दिंडी यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग नोंद केला.