मुक्ताईनगर प्रतिनिधी….
नवीन मुक्ताबाई मंदिराच्या मागे सातोड शिवारात बोदवड रस्त्यावर चिनावल तालुका रावेर येथील तरुणाचा खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
फिर्यादी योगेश मधुकर पाटील धंदा शेती वय 40 राहणार चिनावल तालुका रावेर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक सहा जून 2023 रोजी दुपारी दोन वाजेच्या पूर्वी सातोड शिवारात मुक्ताईनगर ते बोदवड रोडच्या लगत असलेल्या नाल्यात वृंदावन हॉटेलच्या जवळ दगड व टनक वस्तूच्या व हत्याराच्या साह्याने मारहाण करून रवींद्र मधुकर पाटील व 46 याचा खून केल्याची घटना घडली आहे. अज्ञात आरोपींनी तोंडावर डोक्या नाकावर व चेहऱ्यावर जबर मारहाण करून जीवे ठार मारले आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे ,परीक्षा विधीन डी वाय एस पी सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू ,पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे ,व पोलीस कर्मचारी व फॉरेन्सिक पथक दाखल होऊन तपासणी केली तपास संदीप दूनगहू हे करत असून मुक्ताईनगर पोलिसात भादवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मयत रवींद्र हा चिनावल येथील रहिवासी असून तो पतसंस्थेमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली असून त्याचे लग्न झालेले आहे व अपत्य देखील असल्याची माहिती मिळाली आहे त्याची मोटरसायकल मुक्ताईनगर शहरात आढळून आल्याची ही माहिती पोलिसांनी दिली दरम्यान तो मुक्ताईनगर येथे कशासाठी आला व त्याचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला या बाबी अद्यापही अस्पष्ट असून पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.