‘अब की बार नही करेंगे गलती बार बार’-आदित्य ठाकरे

0

मुंबई-देशात बोकाळलेल्या महागाईला कंटाळून जनतेने भाजपला सत्ता दिली. भाजपने लोकसभा निवडणुकीत ‘बस होगई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा बाजी करत सत्ता मिळविली. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देखील महागाई कमी झालेली नाही. पेट्रोल-डीझेलचे दर तर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पेट्रोलचे वाढते दाराच्या निषेधार्थ युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘अबकी बार मोदी सरकार’ या वाक्याला अनुसरून त्यांनी ‘अब की बार नही करेंगे गलती बार बार’ अशा शब्दात टीका केली आहे. ट्वीटरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे.

 

सरकारला प्रश्न 

मुंबईत पेट्रोल ८४ रुपये झाला आहे. २०१४ चा प्रचार विसरलोच… “बहुत हुई महंगाई की मार.. अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार. कर्नाटका निवडणुकीनंतर भाव वाढले.. कदाचित डिसेंबरमध्ये परत निवडणुकीसाठी कमी करतील.. पण भारतीय जनतेला वचनं दिली, ती पूर्ण का नाही करू शकत केंद्र सरकार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.