मुंबई : अनेकदा रणबीर – आलिया एकत्र कार्यक्रमात दिसतात यामुळे या दोघांच्या नात्या विषयीच्या चर्चेला उधाण नुकतीच आलिया रणबीरच्या फॅमिलीसोबत डिनरला गेली होती यामुळे यांच्या लग्नाची गोष्ट पुढे सरकत असल्याची देखील आता चर्चा आहे. तसेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने आलिया आणि त्याच्यात काहीतरी खास नाते असल्याच मान्य केले होते. असे असताना आता आलियाची मोठी बहिण पूजा भट्ट हिने देखील मोठे वक्तव्य केले आहे. पूजा भट्टणे तुम्ही माझ्याशी माझ्या पर्सनल लाईफबद्दल बोलू शकता. पण मी माझ्या बहिणीच्या पर्सनल लाईफबद्दल काहीच बोलू शकत नाही माध्यमांना सांगितले आहे.